Wakad Crime : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

मिलिंद विलास घोगरे (वय 48, रा. चिंचवडगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने बुधवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने घुसला. फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांचा गळा दाबून गैरवर्तन केले. फिर्यादी महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी घरातून पळून गेला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.