Wakad : घराच्या उघड्या दरवाजावाटे चार मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज – घराच्या उघड्या दरवाजावाटे (Wakad) अज्ञात चोरट्याने चार मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी विवेकानंद चौक वाकड येथे उघडकीस आली.
किरण त्रिंबक पटेकर (वय 24, रा. विवेकानंद चौक, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. घरातून फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांचे 79 हजारांचे चार मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजताच्या कालावधीत घडली. वाकड पोलीस (Wakad) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.