Wakad : भाडे वेळेवर न दिल्याने भाडेकरू दाम्पत्यास घरमालकाकडून मारहाण

एमपीसी न्यूज – घराचे भाडे वेळेवर न दिल्याने घरमालकाने भाडेकरू दाम्पत्याला मारहाण केली. तसेच घरातील वस्तूंची तोडफोड केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 14) दुपारी तीनच्या सुमारास थेरगाव वाकड येथे घडली.
चारुशीला किशोर जाधव, किशोर भीमराव जाधव (रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या घरमालक पती-पत्नीची नावे आहेत. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव, वाकड येथे श्रीकृष्ण कॉलनीमध्ये जाधव यांचे घर आहे. त्यांच्या घरात फिर्यादी महिलेचे कुटुंब भाड्याने राहते. फिर्यादी महिलेकडून घराचे भाडे देण्यासाठी उशीर झाला. त्यावरून घरमालक पती-पत्नीने मिळून भाडेकरूंना पती-पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली.
तसेच घरातील टीव्ही, कपाट, कुलर आदी वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.