Wakad : घरफोडी करणा-या दोघांना अटक; तीन गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – रात्रीच्यावेळी घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा ‘युनिट चार’च्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

व्यंकटेश लिंगप्पा चौहान (वय 21) आणि मोहन लोकेश पवार (वय 19, दोघेही रा. गजानन महाराज कॉलनी शेजारील मोकळे जागेत, काळेवाडी फाटा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 11) वाकड पोलीस स्टेशनचे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी शावरसिध्द पांढरे व तुषार काळे यांना माहिती मिळाली की, काही संशयित इंदिरा कॉलेज जवळील बेंगलोर हायवेचे लगत ताथवडे पुणे येथे असलेल्या मोकळ्या जागेत एका रिक्षामध्ये बसले असुन त्यांनी हिंजवडी भागात बऱ्याच घरफोडया चोऱ्या केल्या आहेत.

सध्या त्यांच्याकडे चोरीचे मोबाईल व घरफोडीची साधने आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोन जणांना जागीच पकडले. परंतु रिक्षामधील दोघेजण रिक्षासह पळून गेले. आरोपींना विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरीचे तीन मोबाईल एक लोखंडी कटर असा 17 हजार 500 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. त्यांचेकडुन हिंजवडी पोलीस ठाण्यातील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींना पुढील कारवाईसाठी हिंजवडी पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, सहाय्यक निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस कर्मचारी वासुदेव मुंडे, अदिनाथ मिसाळ, संजय गवारे, नारायण जाधव, प्रविण दळे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, शावरसिध्द पांढरे, लक्ष्मण आढारी, मोहमद नदाफ, तुषार शेटे, सुनिल गुट्टे, प्रषांत सैद, सुरेश जायभाये, गोंविद चव्हाण, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, तुषार काळे, सुखदेव गावंडे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.