Wakad : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर कोयत्याने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ताथवडे येथे बुधवारी रात्री घडली.

आशुतोष उर्फ सोन्या संतोष वराडे (वय 18 रा. गावडे भोईर आळी, चिंचवडगाव) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ पवार, बंटी पवार, कुणाल गराडे, सूरज शेळके (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास फिर्यादी हे ताथवडे येथील बालाजी कॉलेजजवळ सार्वजनिक रस्त्यावर पाणीपुरी खात थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी आशुतोष यांच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी आशुतोष यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश स्वामी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.