Wakad : दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी रिक्षा चालकाने केला जुगाड, अन पुढे घडले असे काही…

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी (Wakad) वाहतूक पोलिसांकडून केली जाणारी चलन कारवाई टाळण्यासाठी एका रिक्षा चालकाने नवीन जुगाड केला. रिक्षा चालकाने केलेला हा जुगाड बुधवारी (दि. 9) सकाळी पोलिसांच्या निदर्शनास आला असून संबंधित रिक्षा चालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण पवाळ (रा. सम्राट चौक, वाकड) असे गुन्हा दाखल केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सुशील किसनराव भंडलकर (वय 40, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या मालकीची एक ऑटो रिक्षा (एमएच 14/जेसी 9711) आहे. ती रिक्षा त्यांचा मित्र प्रितम ननवरे हे चालवतात. 26 जुलै रोजी फिर्यादी सुशील यांना मोबाईलवर 500 रुपये दंडाची पावती आली.

त्यानंतर 28 जुलै रोजी आणखी एक दंडाची पावती आली. वारंवार (Wakad) नियमभंग करत असल्यामुळे सुशील यांनी रिक्षा चालक प्रितम यांना फोन करून विचारणा केली. मात्र प्रितम हे मागील 15 दिवसांपासून आजारी असून त्यांची रिक्षा थांबून असल्याचे प्रितम यांनी सांगितले.

त्यानंतर सुशील यांनी ऑनलाईन माध्यमातून आलेल्या दंडाच्या पावतीला उघडून त्यात रिक्षाचा फोटो पाहिला असता त्यात त्यांच्या रिक्षाचा नंबर असलेली रिक्षा दिसली.

मात्र त्यात दिसणारी रिक्षा आणि त्यावरील चालक यात खूप फरक असल्याने सुशील यांनी थेट पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात धाव घेतली.

Pune : ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास लाच घेतल्या प्रकरणी अटक

आपल्या रिक्षाचा नंबर अनोळखी व्यक्तीने त्याच्या रिक्षाला लावला असून तो वाहतुकीचे नियम मोडत आहे. मात्र, रिक्षावर सुशील यांच्या रिक्षाचा नंबर असल्याने वाहतूक पोलिसांकडून सुशील यांनाच दंडाची पावती येत आहे, अशी लेखी तक्रार सुशील यांनी वाहतूक पोलिसांकडे केली.

9 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सुशील हे काळेवाडी येथील तापकीरनगर येथे आले असता त्यांना त्यांच्या रिक्षाच्या नंबरशी साधर्म्य असलेली रिक्षा दिसली.

Pune : ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास लाच घेतल्या प्रकरणी अटक

त्यांनी तत्काळ 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. वाकड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत रिक्षा पोलीस ठाण्यात आणली. रिक्षाची पाहणी केली असता त्या रिक्षाचा नंबर एमएच 14/जेसी 5801 असा असल्याचे निष्पन्न झाले.

त्या रिक्षाचा मालक किरण पवाळ याने सुशील यांच्या रिक्षाचा नंबर त्याच्या रिक्षाला लाऊन सुशील आणि शासनाची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.