PCMC : सकस आहारासाठी महापालिका मोजणार सव्वा दोन कोटी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 208 अंगणवाडीतील (PCMC) 7  हजार 500 विद्यार्थ्यांना सकस आहार पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी इस्कॉनच्या अन्नामृत फाऊंडेशन या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना खजूर, लाडू, सुकामेवा व फळे असा दररोज सकस आहार देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या 208 अंगणवाड्यात पाच वर्षांखालील 7 हजार 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात येते.

पालिकेच्या शिक्षण विभागाच्या त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये 9 पुरवठादार संस्थांनी सहभाग घेतला. त्यामध्ये 8 पुरवठादार संस्था अपात्र ठरल्या. अन्नामृत फांउडेशनने 36 रुपये प्रति आठवडा असा लघुत्तम दर सादर केला.

तो दर स्वीकारण्यात आला आहे. दररोज विद्यार्थ्यांना सुका पोषण (PCMC) आहार देण्यात येणार आहे. त्यात खजूर, लाडू, सुकामेवा व फळे असा आहार असणार आहे.

त्यासाठी 2 खर्चास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीमध्ये नुकतीच मान्यता दिली आहे.
208 अंगणवाडीतील दोन वर्षांसाठी 2 कोटी 21 लाख 76 विद्यार्थ्यांना हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

Wakad : दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी रिक्षा चालकाने केला जुगाड, अन पुढे घडले असे काही…

त्या लाभ नऊपैकी एकच संस्था पात्र अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यासाठी निविदाप्रक्रिया राबवण्यात आली. त्यामध्ये 9 संस्थांनी भाग होता. मात्र, कागदपत्रे व इतर बाबींमध्ये ते अपात्र झाले.

दुसऱ्यांदा प्रक्रिया केल्याने निविदा समितीने निविदा स्वीकारली. त्यानुसार, अन्नामृत फाऊंडेशनला सकस आहार पुरविण्याचे काम देण्यात आले आहे, असे शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.