Wakad : वाकडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – वाकड परिसरातील एका लॉजवर अनैतिक (Wakad ) मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश करत दोघांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 13) मध्यरात्री करण्यात आली.

धनराज उर्फ धनंजय श्रीराम वाघमारे (वय 29, रा. कात्रज. मूळ रा. अहमदनगर), सचिन अजिनाथ वाल्हेकर (वय 26, रा. कात्रज. मूळ रा. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह रुपेश आणि राहुल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील रांजना लॉज मध्ये आरोपींनी पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी दोन महिलांना प्राप्त केले. दोन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. तसेच त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपींनी आपली उपजीविका भागविली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने लॉजवर छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये दोन महिलांची सुटका करत दोघांना पोलिसांनी अटक (Wakad ) केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त स्वप्न गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, (Wakad) धैर्यशील सोळंके, विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.