Talegaon Dabhade : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे नव्या पिढीचा उद्धार शक्य – डाॅ संभाजी मलघे   

एमपीसी न्यूज – आजच्या बदललेल्या कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या नव्या पिढीला पथदर्शी असे विचारधन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहेत. (Talegaon Dabhade) या पिढीला आपले वैचारिक, शैक्षणिक पुनरूत्थान करण्यास हे विचार नक्कीच प्रेरणादायी ठरतील त्यातूनच नव्या पिढीचा उद्धार शक्य होईल असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. 

 

इंद्रायणी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेत ते बोलत होते.

 

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए आर जाधव, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रमोद बोराडे, प्रा सत्यजित खांडगे, डाॅ. संदीप कांबळे, प्रा. आर आर डोकेसह शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

डाॅ मलघे पुढे बोलताना म्हणाले की, डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे (Talegaon Dabhade) कार्य आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे असून त्यांच्या वाचनाचा व्यासंग, त्यांची पुस्तके आणि त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे डाॅ मलघे म्हणाले.

Pimpri : एमपीएफ पुणे सेंट्रलच्या अध्यक्षपदी ओमप्रकाश मर्दा यांची निवड

 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ प्रमोद बोराडे यांनी केले. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचन आणि लेखन कौशल्यावर भर देत आपल्या अभ्यास विषयाला जास्तीतजास्त वेळ देऊन प्राध्यापकांनी त्यात विशेष प्राविण्य मिळवावे असे आवाहन डॉ बोराडे यांनी केले.

 

याप्रसंगी डॉ संदीप कांबळे व प्रा आर आर डोके यांनी आपली मनोगते व्यक्त  केली. ह्या दोन्ही मान्यवरांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रातील ज्ञात अज्ञात अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकत त्यांच्या महान कार्याचे वैचारिक जागरण आपल्या भाषणातून केले.

 

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे व कार्यवाह चंद्रकांत शेटे हे कार्यबाहुल्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित न राहू शकल्याने त्यांनी आभासी पद्धतीने आपले अभिवादन अर्पण केले. (Talegaon Dabhade) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रा सत्यजित खांडगे यांनी केले तर आभार वाणिज्य विभागाच्या प्रा. राधा गोहाड यांनी मानले.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.