Warje Malwadi : वारजे माळवाडी परिसरात आढळली 30 ते 35 मृत जनावरे

एमपीसी न्यूज- पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरातील गोकुळनगरमध्ये 30 ते 35 जनावरे मृतावस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये 7 कुत्रे, 30 डुक्कर आणि एका मांजराचा समावेश आहे. या प्राण्यांना विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

वारजेतील गोकुळनगर पठार येथील निलगिरी कॉलनी, दत्तनगर परिसरात 7 कुत्रे, 30 डुक्कर आणि एक मांजर मृतावस्थेत आढळून आले. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर वारजे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. जनावरे मृत्युमुखी पडलेल्या ठिकाणच्या आसपास पिठाचे गोळे आढळले. यातूनच या प्राण्यांना विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. दरम्यान इतक्या मोठ्या संख्येने प्राणी मृतावस्थेत आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.