Weather Report : मुंबई, पुण्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

Chance of moderate rainfall in Mumbai, Pune

एमपीसी न्यूज – मुंबई व पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण-गोव्यात बहुतांश, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेल्रेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : उरण 13, मुंबई (सांताक्रूझ) 10, श्रीवर्धन 9, म्हसळा 7, पेडणे 5, अलिबाग, भिरा, कुडाळ, मालवण, मुरुड, पणजी (गोवा) 4 प्रत्येकी, मंडणगड, पनवेल, तळा, वेंगुर्ला 3 प्रत्येकी , बेलापूर (ठाणे), कानाकोना, चिपळूण, देवगड, दोडामार्ग, हरनाई, कणकवली, लांजा, माणगाव, मडगाव, माथेरान, मुळदे, पालघर, राजापूर, रोहा, सावंतवाडी, वसई 2 प्रत्येकी, अंबरनाथ, डहाणू, दापोली, कर्जत, खेड, महाड, म्हापसा, पोलादपूर, फोंडा, केपे, रामेश्वर कृषी, रत्नागिरी, संगमेश्वर देवरुख, ठाणे, वैभववाडी 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: महाबळेश्वर 5, इगतपुरी, पेठ 4 प्रत्येकी, गगनबावडा, ओझरखेडा, पाचोरा, श्रीरामपूर, 3 प्रत्येकी , शाहूवाडी, सुरगाणा 2 प्रत्येकी, आजारा, बोदवड, जामनेर, कर्जत, कोरेगाव, मुळदे, नांदगाव, पन्हाळा, राधानगरी 1 प्रत्येकी.

मराठवाडा: सोयेगाव 5

विदर्भ: मलकापूर 1

घाटमाथा: ताम्हिणी, अम्बोणे 4 प्रत्येकी, इुंगगवाडी, शिरगाव, दावडी 3 प्रत्येकी, कोयना (पोफळी), कोयना (नवजा) 1 प्रत्येकी. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव: अप्पर वैतरणा 6, विहार, तुलसी 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

27 जुलै: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

28 जुलै: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

29-31 जुलै: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

27 जुलै: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

28 जुनै: विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.

29 जुलै: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

30 जुलै: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

31जुलै: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची‍ शक्यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. तर मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.