Pimpri: शहरात आज 1 हजार 24 नवीन रुग्णांची नोंद, 699 जणांना डिस्चार्ज तर 10 जणांचा मृत्यू

1,024 new patients reported today in city, 699 persons discharged, 10 deaths.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 981 आणि शहराबाहेरील 43 अशा 1024 जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली आहे.तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 699 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 17 हजार पार झाली असून 17 हजार 264 वर पोहोचली आहे.

आज 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सांगवीतील 75 वर्षीय वृद्ध, निगडी, यमुनानगरमधील 88 वर्षीय वृद्ध, पिंपरीतील 50, 48 वर्षीय दोन पुरुष, भोसरीतील 26 वर्षाचा युवक, मोशीतील 94 वर्षीय वृद्ध, 36 वर्षाचा युवक, थेरगांवातील 76 वर्षीय वृद्ध, मुळशीतील 66 वर्षीय पुरुष आणि येरवडा येथील 48 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 17 हजार 264 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 11530 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 292 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 77 अशा 369 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3451 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल!
#दाखल झालेले संशयित रुग्ण – 4909
# पॉझिटीव्ह रुग्ण -1024
#निगेटीव्ह रुग्ण – 4411
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण -712
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3451
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 4550
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या -17,264
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3451
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -369
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -11,530
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 24636
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 80961

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.