Weather Report : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेत्रेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: शिवाजी पार्क 5

मध्य महाराष्ट्र: पलूस 2, कडेगाव, खेड, राजगुरुनगर, कोपरगाव 1 प्रत्येकी.

विदर्भ: गोरेगाव, कुरखेडा 2 प्रत्येकी, आमगाव, गोंदिया, सालेकसा 1 प्रत्येकी.

घाटमाथा: काही नाही.

पुढील हवामानाचा अंदाज:

07-08 ऑक्टोबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

09 ऑक्टोबर: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

10 ऑक्टोबर: मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर कोकण गोवा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

06-08 ऑक्टोबर: विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

09 ऑक्टोबर: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

10 ऑक्टोबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता

पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.