Weather Report: दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता

एमपीसी न्यूज – दक्षिण कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडेल, दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खात्रीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: मडगाव, पेडणे, केपे, रत्नागिरी 4 प्रत्येकी, चिपळूण, दाभोलीम (गोवा), मालवण, मारमागोवा, फोंडा, सांगे, सावंतवाडी, वाल्पोई 3 प्रत्येकी, कुडाळ, म्हापसा 2 प्रत्येकी, कानकोन, देवगड, दोडामार्ग, कणकवत्नी, लांजा, राजापूर, संगमेश्वर देवरूख 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: पन्हाळा 5, शिराळा, शिरोळ 4 प्रत्येकी, हातकणंगले, कोल्हापूर, मिरज, पाटण 3 प्रत्येकी, आटपाडी, चांदगड, सांगली 2 प्रत्येकी, आजारा, गगनबावडा,
जाट, कवठे महाकाळ, शाहुवडी, तासगाव, वाळवा इस्लामपूर 1 प्रत्येकी.

मराठवाडा: जळकोट 3.

विदर्भ: आरमोरी 2, भिवापूर, कुही, मौदा, रामटेक, सिरोंचा 1 प्रत्येकी.

घाटमाथा: काही नाही.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव: काही नाही.

पुढील हवामानाचा अंदाज:

04 सप्टेंबर: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍क्यता.

05-06 सप्टेंबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍क्यता.

07 सप्टेंबर: कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍क्यता.

इशारा:

04 सप्टेंबर: दक्षिण कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक
ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

05-06 सप्टेंबर: मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व
विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

07 सप्टेंबर: कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍क्यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.