Pimpri News : सायकल फेरीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत नववर्षाचे स्वागत 

एमपीसी न्यूज : इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या वतीने निरोगी आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी पुणे-अलिबाग-पुणे अशी सायकल फेरी काढून नववर्षाचे स्वागत केले. निर्माण समूहाचे अध्यक्ष सुनील आगरवाल यांच्या हस्ते झेंडा दाखवून रावेत येथील मुकाई चौकातून या फेरीस प्रारंभ झाला.

यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ.सुहास माटे, उद्योजक अण्णा बिरादार, अग्रसेन महाराज किचन ट्रस्टचे अध्यक्ष सीए केएल बंसल, इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे, उपाध्यक्ष अजित पाटील, सचिव गणेश भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

या फेरीमध्ये पुणे-पिंपरी चिंचवड, नाशिक, संगमनेर या शहरातील सुमारे 150 सायकलपटू सहभागी झाले होते. किवळे- लोणावळा- खोपोली- पनवेल- पेण- रेवदंडा (अलिबाग) या मार्गाने हि सायकल फेरी काढण्यात आली.

सुनील आगरवाल म्हणाले, निर्माण समूहाने प्रदूषण कमी होण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘निर्माण ग्रीन’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांर्गत या सायकल फेरीस निर्माण समूहाने सहकार्य केले आहे. इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे 12 हजार सदस्य कार्यरत आहेत. 2016 पासून वर्षभरातून सायकलवरुन पंढरपूर वारी, भक्ती-शक्ती सायक्लोथॉन, घोरावडेश्वर हाइक ॲंड बाईक, बाईक टू वर्क असे उपक्रम राबविले जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.