Pune News : महाबळेश्वरमध्ये पत्नीला जाळले, पतीची पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल होती तिला पेटवून देऊन पसार झालेल्या पतीचा मृतदेह पुण्यात आढळला आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव टेकडीवर त्याने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. राजेंद्र उर्फ राजू महादेव जाधव (वय 55) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, मयत राजेंद्र जाधव हा महाबळेश्वर येथील रहिवासी आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असलेल्या राजेंद्र यांनी 1 सप्टेंबर रोजी पत्नी बायना राजेंद्र जाधव यांच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले होते. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या बायना यांचा मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर महाबळेश्वर पोलिसांनी राजेंद्र जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. 

पुण्यातील आंबेगाव टेकडी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या खिशात असलेल्या एका वस्तू वरून तो महाबळेश्वर येथील राजेंद्र महादेव जाधव असल्याचे उघड झाले. दरम्यान त्याच्या मृतदेहाचे शॉपदानी लचके तोडले असावेत. कारण मृतदेहाचे डोके गायब होते. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.