Pune News : निवडणूक काळात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पुण्यातून एकाला अटक

एमपीसी न्यूज : काही महिन्यांपूर्वी झालेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात सहभागी असल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने पुण्यातून एकाला अटक केली आहे.  केंद्रीय अन्वेषण गुन्हे विभागाचे हे पथक आरोपीला घेऊन रवाना झाले आहे. 

विधानसभाची निवडणूक पार पडल्यानंतर दोन मे रोजी निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. हिंसाचार प्रकरणात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. कोलकत्ता उच्च न्यायालयाने या हिंसाचाराची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.

दरम्यान सीबीआयचे पथक या हिंसाचाराचा तपास करत असताना त्यांना एक आरोपी पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या पथकाने मंगळवारी पुण्यातून या आरोपीला अटक केली आणि त्याला घेऊन ते पश्चिम बंगालला रवाना झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.