Pune : पाच आमदार नगरसेवक पद सोडणार का? इच्छुकांच्या आशा पल्लवीत

एमपीसी न्यूज – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाच नगरसेवकांची आमदारपदी निवड झाली आहे. त्यामुळे हे आमदार नगरसेवक पदाचा राजीनामा देणार का? याकडे पक्षातीलच इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन तुपे, वडगावशेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे, शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून सुनील कांबळे, तर कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक या पाच नगरसेवकांची आमदार म्हणून निवड झाली आहे. मुक्ता टिळक यांना डिसेंबर 2019 पर्यंत महापौर पदाचा वाढीव कालावधी मिळाला आहे.

या आमदारांनी राजीनामा दिला तर आपल्याला नगरसेवक पदाची ‘लॉटरी’ लागणार. यासाठी अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. आमदार झाल्यावर नगरसेवक पद सोडले पाहिजे, असा काही कायदा नाही. दोन्ही पदावर राहता येते. मात्र, इच्छुकांना संधी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.

महापौर पदासाठी आतापासूनच काही नगरसेवकांनी वरिष्ठांकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष पदावरही काम करण्यासाठी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. तर, मुक्ता टिळक या आता आमदार झाल्यावरही महापौर म्हणूनही काम पाहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.