Pimpri : महिला व बालकल्याण समितीचे सदस्य जाणार केरळ दौ-यावर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचे नऊ सदस्य आणि नगरसचिव विभागातील एक लिपीक असे दहा जण पुढील महिन्यात 23 आणि 24 डिसेंबर रोजी केरळच्या अभ्यास दौ-यावर जाणार आहेत. केरळमधील त्रिवेंदममध्ये होणा-या प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला महिला व बालकल्याण समितीच्या सभेत आज मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा आज (गुरुवारी) पार पडली. सभापती निर्मला कुटे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने 30 ऑक्टोबर रोजी महापालिकेला पत्र पाठविले. महापालिकेतील नगरसेवक, नगरसेविका आणि सभेचे कामकाज पाहणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी केरळमधील त्रिवेंदम येथे 23 आणि 24 डिसेंबर रोजी प्रशिक्षण वर्ग आयोजित केल्याचे पत्राद्वारे कळविले.

या प्रशिक्षण वर्गासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींसह नऊ सदस्य आणि नगरसचिव विभागातील एक लिपीक असे 10 जण जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देत प्रत्यक्ष येणा-या खर्चाला मंजुरी देण्यासाठी स्थायी समितीकडे शिफारस केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.