Chikhali : कंपनीतील साहित्य चोरणाऱ्या कामगारांना अटक

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी कंपनीतील साहित्य चोरले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 18) रात्री दहा वाजता कुदळवाडी, चिखली (Chikhali) येथील कुलस्वामिनी इंजिनिअरिंग या कंपनीत घडली.

Pune : पतीकडून चारित्र्यावर संशय, 59 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

अजय लवकुश चौधरी (वय 27), मुकेश राजेंद्र गुप्ता (वय 20), अजय संतोष गुप्ता (वय 20, तिघे रा. चिखली) अशी अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी कंपनीचे मालक सुर्यकांत ढेपे (वय 43, रा. मोशी) यांनी चिखली (Chikhali) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय हा फिर्यादी यांच्या कंपनीत काम करतो. त्याने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून कंपनीतून 58 हजार 900 रुपये किमतीचे जॉबचे मटेरियल कंपनीतून बाहेर काढून चोरी केले. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.