World Update: जगात कोरोनाबाधितांचा आकडा सहा लाखांच्या उंबरठ्यावर! बळींची संख्या 27 हजार 365 वर!

एमपीसी न्यूज – जगभरात आजपर्यंत एकूण पाच लाख 97 हजार 258 रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यापैकी एक लाख 33 हजार 363 रुग्ण उपचारांनंतर कोरोनामुक्त झाले आहेत तर एकूण 27 हजार 365 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात इटलीमध्ये मृत्यूचे तांडव सुरूच होते. एका दिवसात इटलीमध्ये कोरोनाचे 919 बळी गेले. ब्रिटनमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आरोग्य मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

मृत आणि कोरोनामुक्त झालेल्यांची मिळून एक लाख 60 हजार 728 जण वगळले तर आता जगात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 लाख 36 हजार 530 इतकी आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 4 लाख 12 हजार 975 जणांची प्रकृती सुधारत असून 23 हजार 559 कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्या पुढे

अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वांत जास्त म्हणजे एक लाख 04 हजार 205 आहे.  तिथे 2,525 रुग्ण उपचारांनी बरे झाले असून आतापर्यंत एकूण 1,701 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत एकूण 99 हजार 979 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 2,494 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

चीनमध्ये 74 हजार 971 रुग्ण कोरोनामुक्त

कोरोनाचा पहिला उद्रेक चीनमध्ये झाला होता. चीनमध्ये एकूण 81 हजार 394 कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यापैकी 74 हजार 971 रुग्ण बरे झाले आहेत. चीनमध्ये आतापर्यंत 3,295 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. अजून 3,128 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून त्यापैकी 886 जणांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

इटलीत मृत्यूचे तांडव सुरूच,  एका दिवसात 919 मृत्यू

आतापर्यंत इटलीत कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे 9,134 बळी गेले आहेत. इटलीत एकूण 86 हजार 498 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 10 हजार 950 जण बरे झाले. अजूनही 66 हजार 414 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून 3 हजार 732 जणांची प्रकृती गंभीर किंवा चिंताजनक आहे. काल दिवसांत इटलीमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 919 बळी गेले.

स्पेनमध्ये कोरोनाचा उद्रेक

इटलीनंतर स्पेनमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक पहायला मिळत आहे. स्पेनमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 280 नवीन बळी गेल्याने मृतांचा आकडा 5,138 झाला आहे. स्पेनमधील कोरोनाबाधितांचा आकडा 65,719 पर्यंत वाढला आहे. त्यापैकी 4,165 जणांची प्रकृती अजून गंभीर किंवा चिंताजनक आहे.

ब्रिटनचे अर्थ सचिव मॅट हॅनकॉक कोरोना पॉझिटीव्ह

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स व पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या पाठोपाठ अर्थ सचिव मॅट हॅनकॉक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 14,543 झाली असून मृतांचा आकडा 759 झाला आहे. आतापर्यंत 136 जण बरे झाले असून 13,649 सक्रिय कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. त्यापैकी 163 रुग्णांची तब्येत गंभीर अथवा चिंताजनक आहे.

जर्मनीत कोरोनाबाधितांची मोठी संख्या

जर्मनीमध्ये 50,871 कोरोनाबाधित आढळले. जर्मनीतील मृतांचा आकडा 351 असून 1,581 रुग्णांची तब्येत गंभीर किंवा चिंताजनक आहे. कोरोनाबाधित प्रमुख देशांमधील आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचा आकडा दिला आहे. इराण 32,332 (2,378), फ्रान्स 3,964 (1,995), स्वित्झर्लंड 12,928 (231), दक्षिण कोरिया 9,478 (144), नेदरलँड 8,603 (546), ऑस्ट्रिया 7,697 (58), बेल्जियम 7,284 (289).

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.