World Cup 2023 : रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रलियाची सरशी

एमपीसी न्यूज – धरमशाला येथे (World Cup 2023) झालेल्या आस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड या हायस्कोरिंग सामन्यात आस्ट्रेलियाने 5 धावांनी निसटता विजय मिळवला. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिली.

धरमाशालाच्या थंडीतही आस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या रोमहर्षक सामन्यामुळे मैदानावरील वातावरण कमालीचे तापले होते. प्रथम फलंदाजी करतांना विश्वचषक पदार्पणातच ट्रॅवीस हेड याने केलेली झंजावती 109 धावांची शतकी खेळी, डेविड वार्नरच्या 81 धावांसह दोघांनी दिलेल्या 175 धावांच्या दमदार सलामी नंतर मॅक्सवेल 41, जोश इंग्लिस 38 आणि कर्णधार पॅट कमिन्स केलेल्या 37 धावांच्या जोरावर आस्ट्रेलियाने न्यूझीलंड समोर 389 धावांचे बलाढ्य लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड ने चांगली सुरुवात केली.

मात्र, त्यांच्या सलामी फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या रचिन रवींद्रने 116 धावांची (World Cup 2023) शतकी खेळी करत संघाचा धाव फलक हलता ठेवला. त्याला डेरेल मिचेलने 54 योग्य साथ दिली. सातव्या क्रमांकावर आलेल्या जेम्स निशमने शेवट पर्यंत किल्ला लढवला. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 7 धावांची न्यूझीलंडला गरज असतांना स्टार्कच्या गोलंदाजीवर फटकावलेल्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला आणि न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा मावळल्या.

Rahatani : राम मंदिरात महर्षी वाल्मीकी यांची प्रतिमा स्थापित

शेवटच्या चेंडूवर आस्ट्रेलियाने पुनरागमन करत 5 धावांनी हा सामना जिंकला. तथापि, न्यूझीलंडच्या खेळाडूंनी शेवटपर्यंत दिलेली झुंज ही प्रेक्षकांचे मने जिंकून गेली.

तत्पूर्वी गोलंदाजी करताना न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने हॅट्रिक साधली, तसेच ग्लेन फिलिप्स याने 3 गडी बाद केले, सँटनरने 2 बळी घेतले.

आस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पा याने सर्वाधिक 3 गडी बाद केले. जोश हेजलवूड आणि कमिन्स यांनी प्रत्यकी दोन गडी बाद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.