Hindi Day : मास्टरमाईंड ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये विश्व हिंदी दिवस समारोह

एमपीसी न्यूज – नाटकांचे सादरीकरण, काव्य गायन, कथाकथन, भाषण, वाद-विवाद स्पर्धा यांचे  आयोजन करून मास्टर माईंड ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये विश्व हिंदी दिवस साजरा करण्यात आला.

फर्ग्युसन कॉलेजचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.संतोष धोत्रे अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमाची सुरुवात नऊ वाजता सरस्वती वंदना आणि दीप प्रज्वलनाने अध्यक्ष व मुख्याध्यापिका डॉ. प्रदीपा नायर यांच्या उपस्थितीत झाली.शाळेचे प्रशंसक मनिकंडन नायर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या मंगल प्रसंगी विद्यार्थ्यांनी मूकनाटक, नृत्य, पर्यावरण पूरक संदेश देणारे नाटक, साहित्यिक नाटक इ. कार्यक्रम तसेच काव्य गायन, हिंदी दिवसानिमित्त कहाणी कथन, भाषण व वाद- विवाद स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ.संतोष धोत्रे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन केले.त्यांनी हिंदीची लोकप्रियता आणि हिंदी प्रचार प्रसारावर आपले विचार व्यक्त केले.तसेच अध्यक्ष व मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यासोबत वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.