Walk of Confidence : ‘वॉक ऑफ कॉन्फिडन्स’मध्ये विद्यार्थिनींचा ‘फॅशन शो’मध्ये जागतिक विक्रम

एमपीसी न्यूज : ग्रेस लेडीज ग्लोबल ऑर्गनायझेशन सिंगापूर आणि रिता इंडिया फाऊंडेशन, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या फॅशनशोचे आयोजन (Walk of Confidence) करण्यात आले होते.
‘वॉक ऑफ कॉन्फिडन्स’ या नावाने आठवी, नववी आणि दहावीमधील एकूण ८९ विद्यार्थिनीचा हा फॅशन शो, डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल पुणे, भारत येथे “फेस्टिव्ह इव्हेंट 2022” दरम्यान झाला. या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन  रिता  इंडिया फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि ग्रेस लेडीज ग्लोबल ऑर्गनायझेशनच्या राजदूत डॉ. रिता शेटीया आणि ग्रेस  लेडीजच्या क्लब मेंबर डॉ. सविता शेटीया यांनी केले.
‘गर्ल्स एम्पॉवरमेंट’ या थीमवर आधारित ‘फेस्टिव्ह इव्हेंट 2022’ अंतर्गत विद्यार्थिनींना (Walk of Confidence) त्यांच्यातील उत्कट कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने सुरु झालेल्या या फॅशन शो मध्ये विद्याथिनींनी एकमेकांना प्रेरित केले आणि सुंदर पोशाखात स्टेजवर त्यांच्या आत्मविश्वासासह सादरीकरण केले.

89 girls fashion show , global record.jpg

एकूण  89  विद्यार्थिनीनी फॅशन शोसाठी आत्मविश्वासाने चालत “जागतिक विक्रम’ प्रस्थापित केला.  प्रत्येक सहभागी झालेल्या  विद्यार्थिनींना ‘ग्रेस लेडीज ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
शाळेचे प्रिन्सिपल चंद्रकांत हरकूडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. शिक्षिका विल्मा मार्टीस , श्रेया हब्बू , उषा मोरे, शोभा पंचांगमठ, पूजा पुजारी आणि ज्येष्ठ शिक्षक सदानंद तावरगेरी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. शिक्षकेत्तर बसप्पा जवारी आणि मनीषा परदेशी यांनी सभागृह व तांत्रिक व्यवस्था सांभाळली. काही विद्यार्थ्यांनी उत्साहाने फोटोशूट आणि व्हिडीओ काढण्यात मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.