World Update: कोरोनाबाधितांची संख्या 21 लाखांच्या उंबरठ्यावर, मृतांचा आकडा 1,34,677

रुग्णवाढ व मृत्यूंचा वेग पुन्हा वाढू लागल्याने चिंता, एका दिवसात 7 हजार 959 बळी

एमपीसी न्यूज – कोरोनाचे नवीन रुग्ण व मृतांच्या संख्येचा पाच दिवस घसरलेला आलेख कालपासून पुन्हा वरच्या दिशेने झेप घेताना दिसत असल्यामुळे संपूर्ण जगाच्या चिंतेत भर पडली आहे.  जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 20 लाख 84 हजार 595 वर जाऊन पोहचली असून कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1 लाख 34 हजार 677 इतका झाला आहे. 

आतापर्यंत 5 लाख 15 हजार 196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  जगात आता कोरोनाचे 14 लाख 34 हजार 722 इतके सक्रिय असून त्यापैकी 13 लाख 83 हजार 578 रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 51 हजार 144 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

सलग पाच दिवसांतील जगातील कोरोनाबाधितांची संख्या व कोरोनामुळे मृत्यू या दोन्हींच्या वाढीचा वेग मंदावत असतानाच. कालपासून पुन्हा त्यात लक्षणीय वाढ दिसू लागली आहे.  मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

9 एप्रिल –  नवे रुग्ण 85 हजार 638 ,  दिवसभरातील मृतांची संख्या 7 हजार 274

10 एप्रिल –  नवे रुग्ण 94 हजार 629,   दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 973

11 एप्रिल –  नवे रुग्ण 80 हजार 961,   दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 092

12 एप्रिल –  नवे रुग्ण 72 हजार 523   दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 415

13 एप्रिल – नवे रुग्ण 71 हजार 591     दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 423

14 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 966     दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 983

15 एप्रिल – नवे रुग्ण 84 हजार 515     दिवसभरातील मृतांची संख्या 7 हजार 959

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 6,44,089 (+30,206), मृत 28,529 (+2,482)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 1,80,659 (+6,599), मृत 18,812 (+557)
  3. इटली – कोरोनाबाधित 1,65,155 (+2,667), मृत 21,645 (+578)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,47,863 (+4,560), मृत 17,167 (+1,438)
  5. जर्मनी – कोरोनाबाधित 1,34,753 (+2,543), मृत 3,804 (+309)
  6. यू. के. – कोरोनाबाधित 98,476 (+4,603), मृत 12,868 (+761)
  7. चीन – कोरोनाबाधित  82,295 (+46), मृत 3,342 (+1)
  8. इराण – कोरोनाबाधित 76,389 (+1,512), मृत 4,777 (+94)
  9. टर्की – कोरोनाबाधित 69,392 (+4,281), मृत 1,518 (+115)
  10. बेल्जियम – कोरोनाबाधित 33,573 (+2,454), मृत 4,440 (+283)
  11. ब्राझील – कोरोनाबाधित 28,610 (+3,348), मृत 1,757 (+225)
  12. कॅनडा – कोरोनाबाधित 28,379 (+1,316), मृत 1,010 (+107) 
  13. नेदरलँड – कोरोनाबाधित 28,153 (+734) , मृत 3,134 (+189)
  14. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 26,336 (+400), मृत 1,239 (+65)
  15. रशिया – कोरोनाबाधित 24,490 (+3,388), मृत 198 (+28)
  16. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 18,091 (+643), मृत 599 (+32)
  17.  ऑस्ट्रीया – कोरोनाबाधित 14,350 (+124), मृत 393 (+9)
  18. आयर्लंडकोरोनाबाधित 12,547 (+1,068) , मृत 444 (+38) 
  19. इस्राईल – कोरोनाबाधित 12,501 (+455) , मृत 130 (+7)
  20. भारत – कोरोनाबाधित 12,370 (+883) , मृत 422 (+29)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.