World Update: कोरोना रुग्णांची संख्या 12 लाखांवर, मृतांचा आकडा 64 हजार 727, अमेरिकेतच तीन लाखांहून अधिक रुग्ण!

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधितांची संख्या अधिक जास्त वेगाने वाढत असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 12 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज (रविवारी) सकाळर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाख 01 हजार 963 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा 64 हजार 727 पर्यंत वाढला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 46 हजार 638 इतकी झाली, ही बाब थोडा दिलासा देणारी आहे. जगभरात अजून 8 लाख 90 हजार 598 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 42 हजार 290 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

अमेरिकेने कोरोनाबाधितांचा तीन लाखांचा आकडा ओलांडला आहे. एकूण 3 लाख 11 हजार 357 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 8 हजार 452 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क या एकाच शहरात 1 लाख 14 हजार 775 कोरोनाबाधितांची नोंद असून आतापर्यंत कोरोनाच्या बळींची संख्या 3 हजार 565 इतकी झाली आहे. न्यू जर्सी, मिशीगन, कॅलिफोर्निया, ल्युसियाना, मॅसेच्युसेट्स, फ्लोरिडा, पेनसिल्वानिया, इलिनोइस, वॉशिंग्टन, जॉर्जिया, टेक्सास आदी शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे.

इटलीत 15 हजार तर स्पेनमध्ये 12 हजार बळी 

स्पेनने इटलीला मागे टाकत कोरोनाबाधितांच्या संख्येत दुसरा क्रमांक मिळवला आहे. स्पेनमध्ये एकूण 1 लाख 26 हजार168 कोरोनाबाधित असून आतापर्यंत 11 हजार 947 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीत 1 लाख 24 हजार 632 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. इटलीत मृतांचा एकूण आकडा 15 हजार 362 पर्यंत वाढला आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्या चीनला मागे टाकत जर्मनी व फ्रान्समध्ये कोरोनाचा अधिक प्रसार झाल्याचे पाहायला मिळत आहेत. जर्मनीत एकूण 96 हजार 092 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.  जर्मनीत आतापर्यंत 1 हजार 444 कोरोनाबाधित मृत्युमुखी पडले आहेत. फ्रान्समध्ये 89 हजार 953 कोरोनाचे रुग्ण असून आतापर्यंत एकूण 7 हजार 560 बळी गेले आहेत. चीनमध्ये आतापर्यंत 81 हजार 669 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 3 हजार 323 जणांचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश

चीनने कोरोनाचा प्रसार व बळींची संख्या दोन्हींवर नियंत्रण मिळविले असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत चीनमध्ये कोरोनाचे केवळ नवे 30 रुग्ण सापडले असून मृतांचा आकडा केवळ तीनने वाढला आहे. ही काहीसा दिलासा देणारी गोष्ट आहे.

कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झालेल्या इतर देशांमधील कोरोनाबाधिताची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचे आकडे दिले आहेत.

इराण – 55,743 (3,452)

यूके – 41,903 (4,313)

टर्की – 23,934 (501)

स्वित्झर्लंड  – 20,505 (666)

बेल्जियम – 18,431 (1283)

नेदरलँड – 16,627 (1651)

कॅनडा – 13,912 (231)

ऑस्ट्रीया – 11,781 (186)

पोर्तुगाल – 10,524 (266)

ब्राझील – 10,360 (445)

दक्षिण कोरिया – 10,237 (183)

इस्राईल – 7,851 (44)

स्वीडन – 6,443 (373)

ऑस्ट्रेलिया – 5,635 (34)

नॉर्वे – 5,550 (62)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.