WPL : रॉयल चॅलेंजर्सने थांबवली पराभवांची मालिका

एमपीसी न्यूज – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने विमेन्स प्रीमियर लीग मधला पहिला सामना बुधवारी जिंकला. रॉयल चॅलेजर्स नी 5 गडी राखून हा सामना जिंकला.(WPL) आरसीबीने हा सामना जिंकून स्वतःला प्लेऑफ सामन्यांसाठी पात्र ठरण्याची आशा जिवंत ठेवली आहे.
136 धावांचा पाठलाग करताना कनिका अहुजा ने उत्तम कामगिरी केली. कनिका आहुजा आणि रिचा घोष या दोघांनी 6 व्या विकेटसाठी 60 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. कनिकाच्या बाद झाल्यानंतर, रिचाने (31*) दोन षटके शिल्लक ठेवून आरसीबीला जिंकवले.
गोलंदाजी निवडल्यानंतर बंगळुरूने शानदार गोलंदाजी करत यूपी वॉरियर्सला 19.3 षटकात 135 धावात गुंडाळले. आरसीबीच्या मेगन शुट, सोफी डिव्हाईन या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली.(WPL) आशा शोभनाच्या 2 विकेट्स मुळे यूपी वॉरियर्स चे 8.1 षटकात 5 बाद 35 धावा होत्या. एलिस पेरी ने सुद्धा चांगली गोलंदाजी करत 3 विकेट्स मिळवल्या. चांगल्या गोलंदाजी मुळेच यूपी लांजस्त धावा करता आल्या नाहीत आणि आरसीबी ने सामना जिंकला.
.