_MPC_DIR_MPU_III

ठरलं ! Xaomi Mi 10 चे 31 मार्चला भारतात लाँचिंग

नवी दिल्ही : चीनची आघाडीची स्मार्टफोन कंपनी ‘शाओमी’ने 108 मेगापिक्सेलचा ‘Mi 10’ हा नवीन स्मार्टफोन येत्या 31 मार्च रोजी भारतात लाँच करण्याची घोषणा आज ( गुरुवारी ) केली. चीनमध्ये 3,999 युआन म्हणजेच जवळपास 42,500 रुपये किमतीत हा फोन उपलब्ध करण्यात आला आहे.  मात्र,  वाढते जीएसटी दर आणि आयात करामुळे भारतात या फोनच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

_MPC_DIR_MPU_IV

मात्र, अद्याप Xaomi Mi 10च्या भारतातील किमतीबाबत कंपनीकडून अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या महिन्यात शाओमीने हा फोन चीनमध्ये सादर केला होता. त्यानंतर आता 31 मार्चला दुपारी साडेबारानंतर हा फोन भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात येणार असल्याचे शाओमीकडून सांगण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

शाओमीच्या सोशल मीडिया चॅनेल आणि मीडॉटकॉमवर हा इव्हेंट लाईव्ह पाहता येणार आहे. कंपनीचे मनुकुमार जैन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करून ही माहिती दिली.

Xaomi Mi 10 या स्मार्टफोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 चा दमदार प्रोसेसर आहे. 6.67 इंच फुल एचडी + एमोलेडे डिस्प्ले, 4 रिअर कॅमेऱ्याचाही समावेश आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 108  मेगापिक्सेलचा असून, तो 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सेलचा आहे.

या फोनची बॅटरी 4780mah क्षमतेची असून, ती 30 w फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.  हा अँड्रॉइड स्मार्टफोन 10 बेस्ड मीयुआई 11 वर कार्य करतो. यामध्ये 8 जीबी रॅम आणि प्लस 128 जीबी स्टोरेज आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.