New Delhi : परदेशी प्रवासी विमानांना २२ मार्चपासून आठवडाभर भारत बंदी : केंद्राचा निर्णय

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवासी विमानांना २२ मार्चपर्यंत भातात येणास बंदी घालण्यात आली आहे.  केंद्र सरकारने आज ( गुरुवारी) हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाने जगभरात हाहाःकार उडवला आहे. या रोगाने चीनसह अनेक देशांत असंख्य बळी घेतले आहेत. फ्रांस, इराण, अमेरिका, इटली यासह अन्य देशांमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण मोठ्याप्रमाणात आहेत. त्यामध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व प्रवासी विमानांना भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

त्याचबरोबर १० वर्षांखालील मुले  आणि  ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण याच वयोगटातील व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग लवकर होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान, ६५ वर्षांवरिल लोकप्रतिनिधी आणि डॉक्टरांना हा नियम लागू नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.