XII Th Exam Form : 12 वीच्या परिक्षा फाॅर्ममध्ये ‘हिंदू-धर्म’ हा काॅलम समाविष्ट करा

भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने इयत्ता 12 वीचे परिक्षा फाॅर्म भरून घेणे सुरू आहे. या परीक्षा अर्जात परिक्षार्थी यांची पुर्ण माहिती भरणे बंधनकारक असून काॅलम नं.10 मध्ये विद्यार्थी / परिक्षार्थी यांच्या धर्माचा उल्लेख असून इतर धर्माप्रमाणे हिंदू धर्माचाही कॉलम समाविष्ट करावा, अशी मागणी ‘भाजयुमो’च्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत ‘भाजयुमो’च्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या अर्जात हिंदू धर्माचा उल्लेख नाही. हिंदू धर्माच्या जागी फक्त नाॅन मायनाॅरीटी असा शब्द वापरला आहे. हा प्रकार जाणून बुजून केलेला दिसत आहे.

परीक्षा मंडळामध्ये असलेले हिंदू द्वेष्टे अधिकारी यांनी हा प्रकार केलेला दिसत आहे. देशभरात जाणून बुजून हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रकार होत आहे. त्यांच्या व्यापक षडयंत्राचा हा भाग आहे. वास्तविक नाॅन-मायनाॅरीटी या शब्दाच्या जागी हिंदू असा षब्द असणे आवश्यक आहे. या गोष्टीला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे.

या परीक्षा फाॅर्म मधील काॅलम तातडीने दुरूस्त करून त्यामध्ये हिंदू धर्माचा उल्लेख समाविष्ट करावा. दोषीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, अमित कदम, गिरीश पानसरे, सुनिल पुंगडवाले, श्रीराम उंबरे, गणेश इंगळगे, प्रविण सिरसाठे, सचिन लोंढे, राहुल शिदे, सुरज शेरकर, विशाल पाटील, भगवंत गुंड पाटील, प्रसाद मुंडे, ज्ञानेश्वर पडवळ, तेजस गोरे, अक्षय व्यास आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87a78e75ccbe60a2',t:'MTcxNDE0NDgyNS42MDcwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();