Alandi : पूर्व वैमनस्यातून चौघांची तरूणाला मारहाण

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून एका तरूणाला चौघांनी शिवीगाळ करत लाकडी स्टंम्प, दगडाने बेदम मारहाण करत  गंभीर जखमी केले. हा प्रकार आळंदीतील वाघजाई मंदिर येथे घडला.

याप्रकरणी तुषार सोमनाथ अवघडे (वय 18, रा. जाधववाडी, चिंबळी) याने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम एकनाथ जैद व त्याच्या तिन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरूवारी सायंकाळी आरोपींनी रामदेव मार्केटमधील दुकान मालकाला शिवीगाळ केली. यावेळी तुषारने दुकानमालकाला शिवीगाळ करू नका, असे सांगितले होते. त्यावरून चिडलेल्या आरोपींनी शुक्रवारी तुषारला एकटा गाटून शिवीगाळ करत लाकडी स्टंम्प, दगडाने मारहाण केली. आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.