Punvale : पुनावळेत दिवसा-ढवळ्या आठ लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कुलूप-कोयंडा उचकटून चोरट्यांनी शयनगृहातील कपाटामधील आठ लाख 5 हजार 800 रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 6 सप्टेंबर रोजी पुनावळे येथे दिवसाढवळ्या घडली.

याप्रकरणी वैभव गोरक्षनाथ वाघ (वय 31, रा. गगनगिरी सदन, राम मंदिराजवळ, पुनावळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव वाघ यांचे गुरूवारी दुपारी दीड ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत घर कुलूप लावून बंद होते. चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाटामधील 8 लाख 5 हजार 800 रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.