Youth beaten : लोखंडी रॉडने मारहाण करत तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज : चिखली येथे तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करत लुटल्याची घटना सोमवारी (दि.19) रात्री अकरा वाजता घडली. (Youth beaten) जयगणेश ईसकीआप्पा शिवण (वय 28 रा. घरकुल चिखली) याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Alandi chain snaching : आळंदीत पायी चालणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी चार अज्ञात आरोपी तेथे आले व त्यांनी लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात घालून त्यांना जखमी केले.(Youth beaten) यावेळी आरोपींनी फिर्यादी जवळ असलेले 20 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल व 1 हजार 500  रुपये रोख असा एकूण 21 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.