Hinjawadi crime : शेत जमिनीवर बेकायदेशीररित्या तारेचे कुंपण टाकल्या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : जमीन हडपण्याच्या उद्देशाने शेत जमिनीवर बेकादेशीर रित्या तारेचे कुंपण टाकल्या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.(Hinjawadi crime) हा प्रकार 4 जुन ते 17 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडला असून याप्रकरणी मंगळवारी (दि.20) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण दशरथ थोरवे (वय 52 रा.कासारसाई, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून बैजनात कालिदास शर्मा, राजेंद्रकुमार हरिशंकर शुक्ला, रोहित अनिल शुक्ला, अमित उर्फ दिपक बैजनाथ शर्मा, दिपक अनिल शुक्ला, मयुर जयंत शितोळे, लौकीक दत्तात्रय गायकवाड, अमित राजेंद्र शुक्ला, धिरज शुक्ला व इतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Pimpri News : कर्मवीरांची कमवा व शिका योजना पथदर्शी – काशिनाथ नखाते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कासारसाई परिसरात शेतजमीन आहे. (Hinjawadi crime) ते दलीत समाजाचे असून आरोपी हे त्यांची जमीन हड़पण्याच्या उद्देशाने त्यांनी शेतात रात्रीच्या सुमारास अतिक्रमण करून तारेचे कुंपन टाकले. तसेच फिर्यादी यांना व  त्यांच्या कुंटुंबातील महिलांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.