रविवार, सप्टेंबर 25, 2022

MP Girish Bapat : पुणे रेल्वे स्थानकाला पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनचा टर्मिनल म्हणून विकास करा : खासदार गिरीश बापट 

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे स्थानकाला पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनचा टर्मिनल म्हणून विकास करावा अशा सूचना खासदार बापट (MP Girish Bapat) यांनी पुणे रेल्वे विभागाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणे शहरासह उपनगरेही झपाट्याने विकसित होत असून नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले केवळ पुणे रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे सध्या या स्टेशनवर प्रचंड ताण येत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी, रेल्वे व पोलीस प्रशासनावर ताण, तसेच नागरिकांना वेळेवर इच्छित स्थळी पोहचण्यास विलंब आणि आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.(MP Girish Bapat) तसेच भविष्यातही पुणे स्टेशनवरील हा ताण असाच वाढत रहाणार असल्याने पुणे रेल्वे स्टेशनला शहरातच पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनला टर्मिनल म्हणून विकसित केल्यास पुणे स्टेशनवरील ताण कमी होईल असे बापट यांनी सांगितले आहे.

Pimpri News : कर्मवीरांची कमवा व शिका योजना पथदर्शी – काशिनाथ नखाते

याव्यतिरिक्त शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार केला तर खासगी वाहनांनी रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने शहरातील पुणे व इतर रेल्वे स्टेशनवर वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसल्याने रेल्वेने याबाबत तातडीने उपाययोजना करावी.(MP Girish Bapat) हडपसर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना सुविधा उपलब्ध कराव्यात, रस्ते विकसित करावे, रेल्वेने येणाऱ्या व इतर प्रवाशांसाठी पीएमपीएमएल बस व्यवस्था सुरु करावी, रेल्वे स्टेशन पार्किंग (महात्मा गांधी पुतळा) ते ताडीवाला रस्ता स्ट्रॉम वॉटर लाइनचा विकास करणेसाठी रेल्वेने परवानगी द्यावी, मनपा बहुमजली पार्किंगसाठी रेल्वे FOB चा विस्तार करावा, पुणे कँटोन्मेंट कार्यक्षेत्रातील मिरज रेल्वे लाईनवर घोरपडी परिसरात आरओबी बांधण्यासाठी रेल्वेची जमीन महानगरपालिकेला हस्तांतरित करावी आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे बापट यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा व रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

 

 

spot_img
Latest news
Related news