Sangavi : ‘ओएलएक्स’वरून दुचाकी खरेदी करणे तरुणाला पडले महाग  

एमपीसी न्यूज – ‘ओएलएक्स’वर दुचाकी विक्रीची जाहिरात पाहून संबंधित मालकाला तरुणाने संपर्क साधला. दुचाकी खरेदीचा व्यवहार होऊन पेटीएमव्दारे 80 हजार रूपये ट्रान्सफर केले. मात्र, दुचाकी न देताच तरुणाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार नुकताच सांगवी येथे उघडकीस आला.

याप्रकरणी नैनी राजू (वय-25, रा. कुणाल आयकॉन, पिंपळे-सौदागर) याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7253943551, 8306328995, 8426814226 या मोबाईल क्रमांक धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने ओएलएक्सवर व्हेस्पा कंपनीची दुचाकी विक्रीची जाहिरात पाहिली. त्यानुसार फिर्यादीने आरोपींशी संपर्क साधत दुचाकी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. दुचाकीचा व्यवहार 79 हजार 200 रूपये ठरला. त्यानुसार फिर्यादीने आरोपींना पेटीएमव्दारे 79 हजार 200 रूपये ट्रान्सफर केले. मात्र, दुचाकी न देताच राजूची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.