Crime News : घरात चार्जिंगला लावलेला आयफोन अवघ्या 15 मिनिटात चोरीला

एमपीसी न्यूज – घरात चार्जिंगला लावलेला आयफोन अज्ञात चोरट्याने अवघ्या 15 मिनिटात चोरून नेला.ही घटना शनिवारी (दि.27) रात्री दहा ते सव्वादहा या वेळेत कोयना अपार्टमेंट, मोहननगर बाणेर येथे घडली.

शर्वरी विनय पद्मनाभी (वय 20, रा. मोहननगर, बाणेर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांनी त्यांचा 30 हजार रुपये किमतीचा आयफोन हा मोबाईल चार्जिंगला लावला होता.त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता.उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने फिर्यादीचा आयफोन चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.