PMPML : पीएमपीएमएलकडून 10 नवीन बसमार्ग व 4 बसमार्गांचा विस्तार

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) प्रवाशांच्या मागणीनुसार 10 नवीन बसमार्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच, 4 बसमार्गांचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळाने दिली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी 3 फेब्रुवारीपासून 10 नवीन बसमार्ग व 4 बसमार्गांचा विस्तार करण्यात येणार आहे.

10 नवीन बसमार्ग पुढीलप्रमाणे –

  1. उरूळी काचंन ते नांदुर गांव
    मार्गे सहजपूर फाटा
  2. गुजरात कॉलनी ते पुणे स्टेशन
    मार्गे अ.ब.चौक सिटी पोस्ट
  3. आळंदी ते खराडी
    मार्गे विश्रांतवाडी, शास्त्रीनगर, चंदननगर
  4. येवलेवाडी ते पुणे स्टेशन
    मार्गे टिळेकरनगर, काकडे वस्ती, मार्केटयार्ड डेपो
  5. हडपसर ते पुणे स्टेशन
    मार्गे मगरपट्टा, साईनाथनगर, येरवडा
  6. शेवाळवाडी ते न. ता. वाडी
    मार्गे पुलगेट, पुणे स्टेशन, म.न.पा.
  7. आळंदी ते तळेगांव
    मार्गे चिखली, देहूगांव, इंदोरी
  8. घरकुल वसाहत ते पिंपरी गांव
    मार्गे केएसबी चौक, पिंपरी कोर्ट
  9. भोसरी ते चिखली
    मार्गे मोशी मार्केट, बोऱ्हाडे वस्ती
  10. भोसरी ते कोथरूड डेपो
    मार्गे पिंपळे गुरव, औंध, सेनापती बापट रोड

विस्तारीत 4 मार्ग पुढीलप्रमाणे –  PMPML 

  1. हडपसर ते वाघोली
    हडपसर ते थेउर कोलवडी या मार्गाचा विस्तार केसनंद गांव मार्गे वाघोली पर्यंत करण्यात आला आहे.
  2. भारती विद्यापीठ ते शनिवारवाडा
    भारती विद्यापीठ ते स्वारगेट या मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे शनिपार, अ.ब.चौक शनिवारवाडा पर्यंत करण्यात आला आहे.
  3. राजस सोसायटी ते शिवाजीनगर
    राजस सोसायटी ते स्वारगेट या मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे शनिपार, अ.ब.चौक शिवाजीनगर पर्यंत विस्तार
  4. निगडी ते ग्रीनबेस कंपनी
    निगडी ते नवलाख उंबरे या मार्गाचा विस्तार नवलाख उंबरे च्या पुढे ग्रीनबेस कंपनी पर्यंत करण्यात आला आहे.

सदर बससेवेचा लाभ प्रवाशी, नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग व शेतकरी यांनी घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.