Lonavala : नगरपालिका उर्दू शाळा व ऑल सेंट चर्च शाळेचा १०० टक्के निकाल

लोणावळा परिसरातील २० शाळांच्या निकालाची सरासरी ९०.१३ टक्के

एमपीसी न्यूज – शनिवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या माध्यमिक शाळांत परीक्षेच्या निकालामध्ये लोणावळा विभागातून लोणावळा नगरपालिका उर्दू शाळा या उर्दू माध्यमाच्या शाळेने १०० टक्के निकाल नोंदविला. तर केवळ ३ विद्यार्थी परीक्षेस बसलेल्या ऑल सेंट चर्च या शाळेचा निकालही १०० टक्के लागला. याशिवाय तुंगी येथील तुंग माध्यमिक विद्यालयाचा निकालही १०० टक्के लागला आहे.

मावळ तालुक्यातून माध्यमिक शाळांत परीक्षेला एकूण ७२ शाळांमधून ५०७१ विद्यार्थी बसले होते. यातील एकूण ४७३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण सरासरी ९३.३१ इतकी राहिली. लोणावळा शहर आणि परिसरातील एकूण २० शाळांमधून १५०० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी एकूण १३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची एकूण सरासरी ९०.१३ टक्के राहिली.

लोणावळा केंद्र आणि परिसरातील लोणावळा नगरपरिषद पंडित नेहरू विद्यालय (८७.५०टक्के), नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय १००टक्के), गुरुकुल हायस्कूल (९७.५४ टक्के), व्ही.पी.एस. हायस्कूल (८७.५०टक्के), अँड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल (९७.८२ टक्के),डॉ. बी. एन.पुरंदरे विद्यालय (८५.५० टक्के) डी.सी. हायस्कूल (९१.४८ टक्के), श्री एकविरा विद्यामंदिर, कार्ला (८५.१८ टक्के) आणि शांतिदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय, मळवली (८६.६६टक्के), गुरुकुल इंग्लिश मिडियम (८६.२०टक्के) या शाळांनी आपल्या चांगल्या निकालांची परंपरा कायम ठेवली. याशिवाय आंतरभारती बालग्राम विद्यालय (८८.८८टक्के), वामनराव हैबतराव देशमुख विद्यालय, देवघर (६७.६४ टक्के), नागनाथ विद्यामंदिर, औंधे (७०.००टक्के), लोणावळा नगरपरिषद विद्यालय, खंडाळा (९७.६१टक्के), शान्तीसदन (८०.९५ टक्के), सोजर विद्यालय, कुरवंडे (७५.००टक्के) या शाळांच्या विद्यार्थ्यांनीही यश मिळविले. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळांच्या शिक्षकांनी व पालकांनी विेशेष कौतुक केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.