Nigdi : पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून चोरटयांनी एक टेम्पो आणि दुचाकी अशी दोन वाहने चोरट्यांनी चोरून नेली. यापूर्वी शहरातून दुचाक्या, महागड्या गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी निगडी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच देहूरोड पोलीस ठाण्यात मंगळसूत्र चोरीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली पोलीस ठाण्यात हनुमंत संपत पिसे (वय 33, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पिसे यांनी त्यांचा महिंद्रा पिकअप टेम्पो (एम एच 14 / ई एम 3588) घराच्या बाजूच्या रस्त्यावर पार्क केला. शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी त्यांचा टेम्पो चोरून नेला.

निगडी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विष्णुकुमार भागवतीलाल प्रजापती (वय 36, रा. बिबवेवाडी. मूळ रा. कोटा, राजस्थान) यांनी फिर्याद दिली. विष्णुकुमार 5 मे रोजी त्यांच्या मूळ गावी कामानिमित्त गेले होते. दरम्यान त्यांनी त्यांची दुचाकी (एम एच 12 / ए टी 8692) संभाजीनगर येथील अथर्व सोसायटी समोर पार्क करून ठेवली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. विष्णुकुमार रविवारी (दि. 28) गावाहून परत आले असता हा प्रकार उघडकीस आला.

पालखी दर्शनासाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पालखीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 34 हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावले. ही घटना रविवारी (दि. 28) सकाळी साडेनऊच्या सुमारास खंडोबा मंदिर येथे घडली. शोभा गुलाब काळभोर (वय 55) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.