Pune : शम्मी कपूर स्मृतीदिनी ‘द प्रिन्स’ :गीतांचा कार्यक्रम आणि सेवाव्रतींचा गौरव

एमपीसी न्यूज- जे एस सी एज्युकेशनल फौंडेशन आणि ‘संस्नेह माइंड अँड बॉडी हिलिंग सेंटर’ यांच्या वतीने शम्मी कपूर स्मृतीदिनी ‘द प्रिन्स’ हा गीतांचा कार्यक्रम आणि सेवाव्रतींचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) येथे १४ ओगस्ट २०१९ रोजी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती फौंडेशनच्या प्रमुख डॉ स्नेहा जोगळेकर यांनी दिली. शम्मी कपूर यांच्या अजरामर गीतांचे सादरीकरण या कार्यक्रमात होणार आहे.

गायत्री देवी दीक्षित (नृत्याभूषण पुरस्कार), आरोग्य सेवा क्षेत्रातील कार्यासाठी रवींद्रकराडकर (समाजभूषण), दिव्यांगांच्या शिक्षणासाठी कार्यरत डॉ सुप्रिया काळे (समाजभूषण), योग प्रचारासाठी कार्यरत डॉ विदुला शेंडे(योगभूषण), वंचितांच्या विनामूल्य आरोग्यसेवेसाठी डॉ राम शिंदे (आरोग्यभूषण), नाट्यअभिनय क्षेत्रातील कामासाठी प्रबोध कुलकर्णी (कलाभूषण) यांना गौरविण्यात येणार आहे.

ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ पद्मश्री डॉ शरद हर्डीकर, माजी आमदार शरद ढमाले, अष्टांग योग परिवाराचे विश्वस्त स्वामी भीष्माचार्य, सेंट एन्थनी चर्च (मॉडेल कॉलनी) चे फादर रॉक ग्रीन हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.