Pimpri: महापालिका पाणी पुरवठा व जलनिःसारण समिती गठीत करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेतर्फे पाणी पुरवठा व जलनिःसारण समिती गठीत केली जाणार आहे. सर्वपक्षीय ज्येष्ठ नगरसेवक या समितीचे सदस्य असणार आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.  आठ दिवसांपूर्वी दररोज पाणी देण्याचा निर्णय मागे घेत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सोमवारपासून लागू केली आहे. पावसाळ्यातच पाणीकपातीला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. तसेच   शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात नियमीत आणि पुरेशा दाबाने पाणीच मिळत नाही.  बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर आगपाखड केली.शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्न गंभीर आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी  पाणी पुरवठा व जलनिःसारण समिती गठीत करावी. महापालिका अधिनियमात तशी तरतूद आहे. या समितीत वरिष्ठ नगरसेवकांचा समावेश असावा. या समितीच्या माध्यमातून भविष्यातील 30 वर्षाचे पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाईल. नियोजन करुन योग्य पद्धतीने कामकाज करण्यात येईल. त्यामुळे भविष्यात देखील शहर राहण्यायोग्य शहर राहील, असे आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले.

शहरातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेतर्फे दोन दिवसात पाणी पुरवठा व जलनिःसारण समिती गठीत केली जाईल, असे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.