Vadgaon maval : मावळ विचार मंचच्या वतीने उद्यापासून सरस्वती व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज- मावळ विचार मंचच्या वतीने श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे यंदा रविवार दि 29 सप्टेंबर ते मंगळवार दि 8 आॅक्टोबर या कालावधीत सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये नामवंत वक्त्यांची व्याख्याने, कथाकथन आणि कविसंमेलनाची मेजवानी मिळणार आहे.

मावळ विचार मंचच्या वतीने गेल्या 19 वर्षांपासून नवरात्रोत्सावामध्ये व्याख्यानमालेचा उपक्रम राबविला जात आहे.

मावळ विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव (अप्पा) म्हाळसकर, कार्याध्यक्ष डाॅ. रवींद्र आचार्य, व्याख्यानमालेचे नवनिर्वाचित अध्यक्ष किरण म्हाळसकर, कार्याध्यक्ष अरूण वाघमारे, कार्यक्रम प्रमुख हर्षदा दुबे यांनी यावर्षीच्या व्याख्यानमालेची माहिती दिली.

वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात दि 29 सप्टेंबर ते 8 आॅक्टोबर या कालावधीत, दररोज सायंकाळी साडेसहा वाजता सन्माननीय वक्त्यांची व्याख्याने होणार आहेत.

रविवार दि 29 सप्टेंबर, आजची सामाजिक स्थिती या विषयावर हभप नेहा भोसले आपले विचार व्यक्त करणार आहेत. सभेच्या अध्यक्षस्थानी अभिनेत्री आसावरी जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून सुवर्णा कुंभार असणार आहेत.

सोमवार दि 30 सप्टेंबर, माझा चित्रपट प्रवास या विषयावर चित्रपट निर्माते दिग्दर्शक केदार शिंदे व्याख्यान देणार आहेत. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड केशव मगर तर प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार शेखर साने असणार आहेत.

मंगळवार दि 1 आॅक्टोबर, प्रा.संजय कळमकर यांचे
कथाकथन होणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे तर प्रमुख पाहुणे म्हणून नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे असणार आहेत.

बुधवार दि 2 आॅक्टोबर, भगवद्गीता सर्वांसाठी या विषयावर आपले विचार प्रकट करतील. सभेच्या अध्यक्षस्थानी संपर्कचे प्रमुख डाॅ प्रशांत चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसाद कुलकर्णी असणार आहेत.

गुरूवार दि 3 आॅक्टोबर, कविसंमेलन होणार असून यामध्ये कवी नारायण पुरी, कवी भरत दौंडकर, कवी तुकाराम धांडे महाराष्ट्राची काव्यधारा या विषयावर कविता सादर करणार आहेत. सभेच्या अध्यक्षस्थानी हभप दिगंबर ढोकले तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मुरलीधर साठे असणार आहेत.

शुक्रवार दि 4 आॅक्टोबर, शाश्वत ग्रामविकास या विषयावर माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आपले विचार व्यक्त करणार आहेत. सभेच्या अध्यक्षस्थानी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे तर प्रमुख पाहुणे म्हणून सीए प्रा अशोककुमार पगारीया असणार आहेत.

शनिवार दि 5 आॅक्टोबर, शिवरायांचे आठवावे रुप या विषयावर फर्जंद, फत्ते, शिकस्त फेम दिगपाल लांजेकर बोलतील. सभेच्या अध्यक्षस्थानी म.सा. प. मावळचे कार्याध्यक्ष प्रशांत दिवेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक दादासाहेब उऱ्हे असणार आहेत.

रविवार दि 6 आॅक्टोबर, आनंदाचे डोही (संत तुकाराम महाराज) या विषयावर सिने अभिनेते योगेश सोमण आपले विचार मांडतील. सभेच्या अध्यक्षस्थानी शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या सह. बँकेचे मुख्य व्यवस्थापक गिरीश भवाळकर असणार आहेत.

सोमवार दि 7 आॅक्टोबर, एकपात्री कलाकार, ज्योतिष पंडित विश्वास पटवर्धन हे स्वभाव राशींचे या विषयावर बोलतील. सभेच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक संघ मावळचे माजी सचिव उमेश माळी असणार आहेत.

मंगळवार दि 8 आॅक्टोबर, सायंकाळी साडेपाच वाजता विजयादशमीनिमित्त भारत मातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.