Bhosari : रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने पादचारी इसमाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना इंद्रायणी चौक भोसरी एमआयडीसी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

नारायण बसाव्वा पुजारी (वय 55) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आशा सतीश कोटीयन (वय 34, रा. अब्बानकुद्रु, सत्ते कट्टे अपूर व्हिलेज, ता. जि. उडपी, कर्नाटक) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालक दशरथ शिवाजी जगदाळे (रा. लांडेवाडी, भोसरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबर रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास आरोपी दशरथ याने तो चालवत असलेल्या रिक्षाने (एम एच 14 / जी सी 6232) नारायण यांना धडक दिली. हा अपघात इंद्रायणी चौक भोसरी एमआयडीसी येथे घडला. यामध्ये नारायण यांच्या दोन्ही पायास गंभीर दुखापत झाली. त्यातच नारायण यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1