BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : राष्ट्रीय स्केटिंगपटूच्या खूनप्रकरणी आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्केटिंगपटूचा बिअरच्या बाटलीने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 4) सकाळी नऊच्या सुमारास मांरुजीतील कोलते पाटील टाऊनशिपच्या मोकळ्या मैदानात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

विठ्ठल मानमोडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.निलेश शिवाजी नाईक (वय 24, रा. विघ्नहर्ता सोसायटी, सुसगाव, मूळ रा. शाहूनगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ, कोल्हापूर) असे खून झालेल्या स्केटिंगपटूचे नाव आहे. याप्रकरणी कपिल भूपाल नाईक (वय 34, रा. सुसगाव. मूळ रा. चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3