तीन महिन्यात स्वाईन फ्लूचे पिंपरी-चिंचवडमध्ये चार बळी तर 13 रुग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड परिसरात खासगी व महापालिकेच्या रुग्णालयात दिवसेंदिवस स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या 15 दिवसातच स्वाईन फ्ल्यूचे तीन बळी गेले आहेत. तर एकूण 13 स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले आहेत.

महापालिकेच्या वैद्यकीय विभगाने दिलेल्या माहितीनुसार शहरपरीसरात खसगी रुग्णालयात हे 13 रुग्ण अढळले आहेत. त्यापैकी 4 रुग्ण हे अतिदक्षता विभागात आहेत. यामध्ये 2017 या चालू वर्षात 1 ते 10 वर्ष वयोगटातील 4 रुग्ण, 21 ते 30 वर्षातील 1 रुग्ण, 31 ते 40 वर्षात 2 रुग्ण तर  41 ते 50 वर्षातील 4, तसेच 51 ते 60 वर्ष वयोगटात 2 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुरुषांची संख्या 8 तर महिलांची 5 आहे.

वातावरणातील बदल, कमी होत जाणारी रोग प्रतिकारक शक्ती, वाढणारा संसर्ग यामुळे गेल्या 15 दिवसात स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण वाढले आहेत. पुण्यातही चालू वर्षात आत्तापर्यंत स्वाईन फ्ल्यूचे 4 बळी गेले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  वैद्यकीय विभागातर्फे महापालिकेच्या 8 ही रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या लस उपलब्ध आहेत. तर शहरातील एकूण 49 दवाखान्यांमध्ये स्क्रीनिंग सेंटर आहेत जिथून स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळताच महापालिका रुग्णालयांना त्वरीत कळविण्यात येणार आहे. शहरात स्वाईन फ्ल्यूसाठी एकूण 9 अतिदक्षता विभाग आरक्षीत ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. अनिल रॉय यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.