Chinchwad : जिम्नास्टिक विश्वचषक स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी वृंदा सुतार हिची निवड

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांची या स्पर्धेत पंच म्हणून निवड

एमपीसी न्यूज- अझरबाईजान देशात बाकु येथे 14 ते 16 मे दरम्यान ऐरोबिक्स जिम्नास्टिक विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठीची निवडचाचणी येत्या 2 फेब्रुवारी रोजी प्रयागराज (अलाहाबाद) येथे होणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड मधील खेळाडू वृंदा सुतार हिची 14 वर्षाखालील वयोगटात निवड झाली आहे अशी माहिती संचालिका अलका तापकीर यांनी दिली.

त्याचप्रमाणे भारतीय जिम्नास्टिक संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांचे या स्पर्धेत पंच म्हणून निवड झाली आहे. राज्यस्तरीय खेळाडू व प्रशिक्षक क्षितिजा राऊत क्लबतर्फे प्रशिक्षक म्हणून कार्यभार संभाळणार आहे. नुकत्याच बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत वृंदा हिने दुसरे स्थान पटकावून राष्ट्रीय स्पर्धेत आपले स्थान नक्की केले होते.

आंतरराष्ट्रीय निवडचाचणीसाठी निवड होणारी वृंदा सुतार ही पिंपरी चिंचवड मधील पहिली खेळाडू असून चैतन्य कुलकर्णी व किर्ती जाधव व इतर पालकांनी वृंदा सुतार व हर्षद कुलकर्णी यांचे कौतुक केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.