Pimpri : पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडत असलेल्या ज्येष्ठ महिलेची 60 हजारांची सोनसाखळी हिसकावली. ही घटना सोमवारी (दि. 27) सकाळी पावणेआठच्या सुमारास वल्लभनगर एसटी स्टँडच्या गेटसमोर घडली.

_MPC_DIR_MPU_II

लिनी लॉरेन्स गिलबट (वय 62, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास फिर्यादी वल्लभनगर एसटी स्टँडच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी मोपेड दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची 60 हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.