Wakad : जागेचा बेकायदेशीर ताबा घेत तोडफोड केल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – जागेचा बेकायदेशीररित्या ताबा घेऊन तोडफोड केल्याप्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री रहाटणी येथे घडली.

प्रकाश जवळेकर, रुपेश प्रकाश जवळेकर, आशा प्रकाश जवळेकर, मोहन धारिया आणि इतर 10 ते 12 जण (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कुंदन रामचंद्र जाचक (वय 40, रा. गंगा पार्क, पिंपळे सौदागर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाचक हे बांधकाम व्यवसायिक आहेत. रहाटणी येथे त्यांची भागीदारीत जागा आहे. शनिवारी आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी जाचक यांच्या मालकीच्या जागेत बेकायदेशीररित्या प्रवेश केला. त्यानंतर जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने फिर्यादी यांच्या जागेची पत्र्याची सीमाभिंत पाडली. तसेच लोखंडी प्रवेशद्वार आणि क्रिकेटच्या सरावासाठी बांधलेली नेट पाडून टाकत खेळपट्टही उद्धवस्त करून नुकसान केले. त्यांना रोखण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांना शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.