Pune : स्कूल बसच्या धडकेत 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – स्कूल बसने दिलेल्या धडकेत 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शुक्रवारी (दि.21) सकाळी सातच्या सुमारास आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रोडवर घडली. याप्रकरणी संतोष शेलार (वय 46, रा. आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली.  

कृष्णा बाजीराव बागुल (आंबेगाव बुद्रुक), असे बस चालकाचे नाव आहे. साहिल शेलार (वय 16, रा. आंबेगाव खुर्द) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा बागुल यांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात स्कूल बस चालवून फिर्यादी यांचा मुलगा साहिल हा ट्युशन संपल्यानंतर सायकलवरून जांभूळवाडी रस्त्याने घरी जात होता. तेव्हा त्याला स्कूल बस चालकाने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.